मंत्री नितेश राणे यांच्याकडून कणकवलीतील दुर्गामातेचे दर्शन; आरती करून घेतले आशीर्वाद

0
8

भाजप कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सवाला भेट; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

कणकवली :
भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्गामातेचे मनोभावे दर्शन घेतले आणि आरती करून देवीचा आशीर्वाद घेतला.

या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पप्पू पुजारे, सागर राणे, दादू राणे आणि शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here