नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ; ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत राबविणार उपक्रम

0
4

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यावर भर

कणकवली :
कणकवली तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य यात्रा राबविण्यात येणार आहे. आरोग्यसेवा मिळविण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेपर्यंत येण्याऐवजी आरोग्य यंत्रणेनेच नागरिकांपर्यंत पोहोचणे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’मुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रूहीता तांबे, जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी व सुप्रिया मेस्त्री, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, डॉ. सुबोध इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे, सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच रविराज मोरजकर, पांढरी वायंगणकर, डॉ. पंकज पाटील, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत आणि दिलीप तळेकर आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here