मंत्री योगेश कदम यांच्याकडून दापोलीतील नवरात्रोत्सव मंडळांना भेटी; देवीमातेचे घेतले दर्शन
दापोली :
नवरात्रोत्सवानिमित्त मंत्री योगेश कदम यांनी दापोली तालुक्यातील विविध मंदिरांना आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देऊन देवीमातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.



