रायगड पोलीस दलाला सामाजिक बांधिलकीतून ४ हिरो पॅशन प्लस मोटारसायकली भेट
रायगड पोलीस दलाला सामाजिक बांधिलकीतून ४ हिरो पॅशन प्लस मोटारसायकली भेट
रायगड :
सामाजिक बांधिलकी आणि पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने मे. पूष्पम बोरा वेंचर्स एलएलपी यांच्या वतीने रायगड पोलीस दलाला चार हिरो पॅशन प्लस मोटारसायकली भेट स्वरूपात प्रदान करण्यात आल्या. या उपक्रमातून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आणि पोलीस दलाच्या कार्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला.
पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने कर्तव्य बजावत असते. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत मे. पूष्पम बोरा वेंचर्स एलएलपी यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला.
या मोटारसायकलींमुळे रायगड पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजाला आणि कार्यक्षमतेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. सामाजिक संस्थांनी आणि उद्योजकांनी समाजाच्या हितासाठी पुढाकार घेण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे.
या सहकार्याबद्दल रायगड पोलीस दलाच्या वतीने मे. पूष्पम बोरा वेंचर्स एलएलपी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.