कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी घेतला आढावा

0
20
कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी घेतला आढावा
कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी घेतला आढावा

कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्ग :
कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसाठी पात्र नागरिकांना प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेचा आढावा निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात ही बैठक पार पडली.
या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष उपेंद्र तामोरे, समिती सदस्य विशाल नाईक, सदस्य सचिव तुषार गवळी, दक्षता पथकाच्या पोलीस उपअधीक्षक प्रतिक्षा खेमनाळकर आणि पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील उपस्थित होते.
बैठकीत कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील प्राप्त अर्ज, वितरित करण्यात आलेली जात प्रमाणपत्रे, नामंजूर प्रस्ताव, दक्षता पथकाकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव तसेच समिती स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयांकडून जून २०२६ नंतर तपासण्यात आलेले नवीन अभिलेख, त्यामध्ये आढळलेल्या अतिरिक्त नोंदी आणि या नोंदींच्या आधारे नागरिकांकडून विहित नमुन्यात प्राप्त झालेले अर्ज यांची माहिती घेण्यात आली. तसेच प्रमाणपत्र वितरण आणि प्रलंबित अर्जांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला.
जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेशी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही नियमानुसार आणि विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. पात्र नागरिकांच्या अर्जांवर नियमांनुसार कार्यवाही करून प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here