छेडा नगरमध्ये वार्षिक हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात; महापौर रितू तावडे यांची उपस्थिती
मुंबई : छेडा नगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या (CRWA) मैदानात, छेडा नगर, चेंबूर (पश्चिम) येथे आयोजित वार्षिक हळदी-कुंकू कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित राहिल्या. महाराष्ट्रीय संस्कृती आणि परंपरेचा अनमोल वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमात महिला व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.



