डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विम्याचे व्यवहार १ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बंद

0
11

नवीन सॉफ्टवेअर प्रणालीत स्थलांतर; ग्राहकांना व्यवहारांचे नियोजन करण्याचे डाक विभागाचे आवाहन

डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) सेवांसाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणालीत बदल करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे रविवार, १ नोव्हेंबर ते रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संबंधित सेवांसाठी ‘नो ट्रान्झॅक्शन डे’ घोषित करण्यात आला आहे.
सध्या वापरण्यात येणाऱ्या McCamish या सॉफ्टवेअर प्रणालीचे नवीन इन्शुरन्स मॅनेजमेंट सोल्यूशन (IMS) प्रणालीमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व पोस्ट ऑफिसमधील काउंटरवर PLI आणि RPLI पॉलिसींशी संबंधित कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच या विमा सेवांशी संबंधित ऑनलाइन सुविधाही उपलब्ध राहणार नाहीत.
त्यामुळे डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसीधारकांनी आपल्या पॉलिसींशी संबंधित प्रीमियम भरणे तसेच इतर आवश्यक आर्थिक व्यवहारांचे नियोजन करावे. हे व्यवहार १ नोव्हेंबरपूर्वी किंवा ८ नोव्हेंबरनंतर पूर्ण करावेत, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here