सागरी अवैध मासेमारी रोखण्यासाठी डिसेंबरपूर्वी ९ ड्रोन व गस्ती नौका खरेदीच्या सूचना

0
11
सागरी अवैध मासेमारी रोखण्यासाठी डिसेंबरपूर्वी ९ ड्रोन व गस्ती नौका खरेदीच्या सूचना
सागरी अवैध मासेमारी रोखण्यासाठी डिसेंबरपूर्वी ९ ड्रोन व गस्ती नौका खरेदीच्या सूचना

सागरी अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी डिसेंबरपूर्वी गस्ती नौका व ९ ड्रोन खरेदीच्या सूचना

मुंबई :
राज्यातील सागरी अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंमलबजावणी कक्षाच्या कामकाजाचा आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात झालेल्या बैठकीत घेतला.
या बैठकीत अंमलबजावणी कक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यानुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली. राज्यातील सागरी सुरक्षेच्या दृष्टीने गस्ती नौकांची खरेदी तसेच अतिरिक्त ९ ड्रोन कॅमेरे खरेदी करण्यासंदर्भातील प्रलंबित प्रस्तावांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. डिसेंबरपूर्वी गस्ती नौका आणि ड्रोन कॅमेरे खरेदी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
याशिवाय, क्रियाशील मच्छीमार सभासदांना मासेमारी बंदीच्या कालावधीत उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. आंध्र प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छीमार बांधवांसाठी प्रभावी आर्थिक सहाय्य योजना राबविण्याच्या शक्यतेवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीस मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश खपले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here