
साई प्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
सदस्यांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर करण्याच्या सूचना
मुंबई :
‘साई प्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित’ या संस्थेतील प्रलंबित सदनिका हस्तांतरण प्रकरणाबाबत महापौर रितू तावडे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सदनिका हस्तांतरण प्रक्रियेतील अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


