रायगड जिल्ह्यातील ४० पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप

0
8

रायगड :
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना अन्नसुरक्षेचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील ४० पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात हा वितरण कार्यक्रम पार पडला.

रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील पात्र लाभार्थ्यांना या शिधापत्रिकांच्या माध्यमातून अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना रास्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देऊन त्यांची अन्नसुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र शेळके यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here