जयगड शिपयार्डसाठी प्रस्तावित पुलाची उंची वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा; मंत्रालयात आढावा बैठक

0
10

रत्नागिरी :
जयगड येथे प्रस्तावित गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या ग्रीनफिल्ड शिपयार्ड प्रकल्पाच्या कार्यान्वयनाच्या दृष्टीने तावसाळ ते जयगड दरम्यान जयगड खाडीवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित दोन पदरी पुलाच्या उंचीबाबत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रस्तावित पुलाची उभ्या दिशेतील उंची (Vertical Height Clearance) सध्या ३९.१९३ मीटर निश्चित करण्यात आली आहे. मात्र, गोवा शिपयार्डच्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड शिपयार्डच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी लक्षात घेता या उंचीत अतिरिक्त वाढ करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
जयगड परिसरातील जहाजबांधणी उद्योग आणि सागरी विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करणे गरजेचे आहे. भविष्यातील औद्योगिक गरजा आणि शिपयार्डच्या कामकाजाचा विचार करून पुलाच्या उंचीबाबत योग्य निर्णय घेण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
या प्रक्रियेशी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आवश्यक कार्यवाही करून प्रस्तावित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, गोवा शिपयार्डचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here