देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

0
9

देवगड :
देवगडच्या ऐतिहासिक वैभवात आणि पर्यटन आकर्षणात भर घालणाऱ्या नव्या उद्यानाची निर्मिती किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी उद्यानाचा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि अथांग समुद्राचे विहंगम दर्शन यांचा अनोखा संगम या उद्यानाच्या माध्यमातून पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन
देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन
देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक परिसरात साकारण्यात येणारे हे उद्यान पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे देवगडच्या पर्यटन नकाशावर आणखी एका आकर्षक पर्यटनस्थळाची भर पडणार असून, स्थानिक पर्यटन व्यवसायालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेता हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्री, स्थानिक उत्पादने आणि इतर पर्यटनपूरक व्यवसायांसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात. परिणामी स्थानिक रोजगारनिर्मितीलाही हातभार लागणार आहे.
देवगडचा ऐतिहासिक वारसा जतन करून त्याचा पर्यटन विकासासाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व कायम राखत परिसराचे सुशोभीकरण केल्यास देवगडच्या पर्यटनाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, नंदकुमार घाटे, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here