देवगडच्या एस.टी. आगाराजवळील ‘Y जंक्शन’चे होणार सुशोभीकरण; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन
देवगडच्या एस.टी. आगाराजवळील ‘Y जंक्शन’चे होणार सुशोभीकरण; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन
देवगड :
देवगड शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुसज्ज आणि सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने एस.टी. आगाराजवळील ‘Y जंक्शन’च्या सुधारणा व सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला.
देवगडच्या एस.टी. आगाराजवळील ‘Y जंक्शन’चे होणार सुशोभीकरण; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन
या प्रकल्पांतर्गत जंक्शनच्या ठिकाणी आकर्षक सर्कल उभारण्यात येणार असून, त्यावर देवगडची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा आकर्षक पुतळा (स्टॅच्यू) साकारण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच देवगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांना येथील ऐतिहासिक वैभव आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणारे नवे आकर्षण उपलब्ध होणार आहे.
देवगड शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या या जंक्शनचे नियोजनबद्ध सुशोभीकरण केल्यामुळे परिसर अधिक आकर्षक होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतुकीच्या दृष्टीनेही या ठिकाणी आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.
देवगड शहराचा नियोजनबद्ध विकास, शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नंदकुमार घाटे, बाळ खडपे, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, गटनेते शरद ठूकरूल, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, इंजिनिअर अभिजित कामत, उल्हास मणचेकर, प्रकाश राणे, महेश ताम्हणकर, सुभाष कुलकर्णी, अजयकुमार सर्वगोड, डॉ. सुनील आठवले तसेच देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष उगलमुगले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.