रत्नागिरी पोलीस दलातील तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव

0
7

रत्नागिरी :
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या तीन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण श्री. प्रकाश बेले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. उत्तम पिलंकार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. यशवंत बोडकर यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला.

या समारंभाला पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here