पोलीस उपनिरीक्षक सुधीर कृष्णाजी आंगणे सेवानिवृत्त; सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून शुभेच्छांचा वर्षाव

0
8

सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर कृष्णाजी आंगणे (बाबा) हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
पोलीस दलातील आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात आंगणे यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाच्या भावनेतून सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळातील योगदान, अनुभव आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा निश्चितच कौतुकास्पद असून त्यांचे कार्य सहकाऱ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
सेवानिवृत्तीनंतरच्या नव्या आयुष्यात त्यांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, तसेच पुढील वाटचाल आनंददायी होवो, अशा मनःपूर्वक सदिच्छा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे व्यक्त करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here