सुक्या चाऱ्याला १२ रुपये, तर मुरघासाला ८ रुपये प्रति किलो कमाल आधारभूत दर निश्चित
सुक्या चाऱ्याला १२ रुपये, तर मुरघासाला ८ रुपये प्रति किलो कमाल आधारभूत दर निश्चित
मुंबई :
पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुक्या चाऱ्यासाठी कमाल १२ रुपये प्रति किलो, तर मुरघासासाठी कमाल ८ रुपये प्रति किलो असा आधारभूत दर निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पशुपालकांना चारा खरेदी करताना आर्थिक नियोजन करणे सुलभ होण्यास मदत होणार आहे.
सुक्या चाऱ्याचे आणि मुरघासाचे दर निश्चित केल्यामुळे पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला नियोजनबद्ध स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.