कोकणातील रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा

0
4

राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी स्थानकांवरील प्रश्न मांडले; प्रवाशांच्या सुविधांसाठी सकारात्मक कार्यवाहीची मागणी

कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांची (COM) भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. यावेळी राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यासह प्रवाशांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चारही स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांचे थांबे उपलब्ध झाल्यास परिसरातील नागरिक, नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी भूमिका आमदार प्रमोद जठार यांनी मांडली. तसेच स्थानकांवरील प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
कोकणातील प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन या मागण्यांवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रवाशांच्या हितासाठी या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here