शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी संपूर्ण माहिती भरलेला Form A-3 अर्ज छायाचित्रासह सादर करणे आवश्यक आहे. तसेच शस्त्र वापरण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणित करणारे तालुका ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्याकडील S-3 नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागेल. संबंधित पोलीस निरीक्षकांची स्वाक्षरी व शिक्क्यासह Form S-4, शस्त्र पडताळणी केल्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचे प्रमाणपत्र तसेच सरपंच, पोलीस पाटील किंवा नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवासी व वर्तणुकीचा दाखला अथवा आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. यासोबत मूळ शस्त्र परवानाही जोडावा.
पाच वर्षांच्या नूतनीकरणासाठी २,५०० रुपये शुल्क शासनाकडे जमा करावे लागणार आहे. नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. विलंबाने अर्ज सादर करणाऱ्यांनी विलंबाचे सबळ कारण दर्शविणारा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. Form A-3 अर्ज तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नूतनीकरणाचे अर्ज पोस्टाद्वारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण केलेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविण्यात येणार नाहीत. त्यामुळे संबंधित परवानाधारकांनी आपल्या तालुक्यासाठी निश्चित केलेल्या तारखेलाच मूळ शस्त्र परवाना आणि आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील उपचिटणीस शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून नूतनीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शस्त्र परवान्यांची मुदत ३१ डिसेंबरला संपणार; नूतनीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे तालुकानिहाय वेळापत्रक जाहीर
सावंतवाडीपासून वैभववाडीपर्यंतच्या परवानाधारकांसाठी डिसेंबरमध्ये तारखा निश्चित; पाच वर्षांच्या नूतनीकरणासाठी २,५०० रुपये शुल्क
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे, त्यांनी परवान्यांचे नूतनीकरण करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
नूतनीकरणासाठीचे अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील उपचिटणीस शाखेत प्रत्यक्ष सादर करावेत. अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी १ अशी असून, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. एकाच दिवशी गर्दी होऊ नये, यासाठी तालुकानिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
तालुकानिहाय अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक :
सावंतवाडी : १, २ व ३ डिसेंबर २०२६
दोडामार्ग : ४ व ७ डिसेंबर २०२६
वेंगुर्ला : ८, ९ व १० डिसेंबर २०२६
कुडाळ : ११, १४ व १५ डिसेंबर २०२६
मालवण : १६, १७ व १८ डिसेंबर २०२६
कणकवली : २१, २२ व २३ डिसेंबर २०२६
देवगड : २४, २८ व २९ डिसेंबर २०२६
वैभववाडी : ३० व ३१ डिसेंबर २०२६