दादरमध्ये भाजपा महायुतीची ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रा

0
6
दादरमध्ये भाजपा महायुतीची ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रा
दादरमध्ये भाजपा महायुतीची ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रा

दादरमध्ये भाजपा महायुतीची ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा; महायुतीचे मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग

मुंबई :
भाजपा महायुतीच्या वतीने मुंबईतील दादर येथे ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या घोषवाक्याखाली पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी संविधान, लोकशाही आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी ही लढाई संविधान विरुद्ध शरिया अशी असल्याचा दावा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान इंडिया आघाडीला मान्य नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते पाकिस्तानची स्क्रिप्ट वाचून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
घुसखोर आणि देशविरोधी शक्तींविरोधात सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र येण्याची गरज असून, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या सुरक्षेसाठी एकजुटीचा संदेश या पदयात्रेतून दिला पाहिजे, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.
या पदयात्रेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री नितेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here