ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत ऑफलाईन अर्जाची मुदत; सिंधुदुर्गातील पात्र विद्यार्थ्यांना आवाहन

0
10

सिंधुदुर्ग :
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गांतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्यात येत आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेत भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यमान (Existing) पात्र विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेसाठीचे ऑनलाईन पोर्टल सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १३ नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे मुदतीत जमा करावेत.
जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here