भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताह ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान; राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन

0
9
भगवान बिरसामुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहा
भगवान बिरसामुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहा

भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताह ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान; राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन

मुंबई :
बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह शासकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
आदिवासी बांधवांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने या सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या जल, जंगल आणि जमीन या नैसर्गिक संसाधनांवरील हक्कांच्या संरक्षणासाठी तसेच पारंपरिक अधिकारांसाठी ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष केला. त्यांच्या या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करण्यासाठी केंद्र शासनाने १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून घोषित केला आहे.
आदिवासी स्वातंत्र्यवीरांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, इतिहास, भाषा आणि सामाजिक अस्मिता यांचे जतन व संवर्धन करणे हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here