मुंबईकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार; ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ सदनिकांचे वितरण
मुंबईकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार; ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ सदनिकांचे वितरण
मुंबई :
मुंबईतील मराठी कुटुंबांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सदनिकांचे वितरण करण्यात आले.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून जुन्या चाळींमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना आधुनिक आणि सुसज्ज घरांचा लाभ मिळत आहे. मुंबईतील मराठी माणसाला आपल्याच शहरात हक्काचे घर उपलब्ध व्हावे, हा या पुनर्विकासामागील महत्त्वाचा उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती सचिन अहिर, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार मिलिंद देवरा, आमदार डॉ. मनीषा कायंदे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.