व्हीबी-जी रामजी योजनेतून अडीच एकर बांबू लागवडीसाठी ७ लाखांचे अनुदान

0
17
व्हीबी-जी रामजी योजनेतून अडीच एकर बांबू लागवडीसाठी ७ लाखांचे अनुदान
व्हीबी-जी रामजी योजनेतून अडीच एकर बांबू लागवडीसाठी ७ लाखांचे अनुदान

व्हीबी-जी रामजी योजनेतून अडीच एकर बांबू लागवडीसाठी ७ लाखांचे अनुदान

बांबू उद्योगातून शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधावी – पालकमंत्री भरतशेठ गोगावले

शिरगाव (रायगड) :
बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधावी. रायगड जिल्ह्यात बांबू उद्योगाचे आदर्श मॉडेल उभे करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.

मुरुड तालुक्यातील शिरगाव येथे उद्योग आयुक्तालयांतर्गत रायगड जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित ‘ग्रीन केन बांबू वर्ल्ड असोसिएशन’च्या सामाईक सुविधा केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रकल्पामुळे बांबू उत्पादन, प्रक्रिया आणि त्यावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना गोगावले यांनी व्हीबी-जी रामजी योजनेच्या माध्यमातून बांबू लागवडीसाठी अडीच एकर क्षेत्राकरिता सात लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध होण्याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे केवळ शेतीपूरक व्यवसाय म्हणून न पाहता उत्पन्नाचे शाश्वत साधन म्हणून पाहावे. बांबू उद्योगातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
या भूमिपूजन सोहळ्याला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, तहसीलदार आदेश डफळ, पंचायत समितीचे सभापती निलेश घाटवळ, जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त जी. एस. हरळय्या आणि ग्रीन केन बांबू वर्ल्ड असोसिएशनचे रुपेश जामकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here