रत्नागिरी :
दीपावली सणानिमित्त रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू देण्यात आल्या

यावेळी महामुनी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस विभागाच्या कामकाजात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.



