मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
मुलांना सायकली व भेटवस्तूंचे वाटप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी; मुलांना सायकली व भेटवस्तूंचे वाटप
मुंबई :
राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकरी आणि आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी परिसरातील खांबांचा पाडा येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
मुलांना सायकली व भेटवस्तूंचे वाटप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी; मुलांना सायकली व भेटवस्तूंचे वाटप
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आदिवासी पाड्यातील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके, बिस्किटे आणि सायकलींचे वाटप केले. या भेटवस्तूंमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव हा आतापर्यंतच्या सर्वांत खास दिवाळीच्या आठवणींपैकी एक असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सण-उत्सवांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि गरजू कुटुंबांसोबत आनंदाचे क्षण वाटून घेता यावेत, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.