कुळगाव-बदलापूरमध्ये नदीपात्रात भराव टाकून नदी बुजवण्याचा आरोप; प्रशासनाला सवाल

0
7
कुळगाव-बदलापूरमध्ये नदीपात्रात भराव टाकून नदी बुजवण्याचा आरोप; प्रशासनाला सवाल
कुळगाव-बदलापूरमध्ये नदीपात्रात भराव टाकून नदी बुजवण्याचा आरोप; प्रशासनाला सवाल

कुळगाव-बदलापूरमध्ये नदीपात्रात भराव टाकून नदी बुजवण्याचा आरोप; प्रशासनाला सवाल

नद्या बुजवून कसली छठपूजा? नदीपात्रातील भरावावरून प्रशासनाला सवाल; पर्यावरण मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी

ठाणे-
ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूरमध्ये नदीपात्रात भराव टाकून नदी बुजवली जात असल्याचा आरोप; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
ठाणे : नदीचे अस्तित्वच धोक्यात आणून कसली छठपूजा करणार, असा संतप्त सवाल उपस्थित करत ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर परिसरातील नदीपात्रात होत असलेल्या भरावाबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून नदी बुजवली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नदीचे नैसर्गिक पात्रच नष्ट होत असेल, तर पर्यावरणाचे रक्षण कोण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नदीपात्रातील या प्रकाराकडे ठाणे जिल्हाधिकारी आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका काय आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. नदीपात्रात भराव टाकण्याच्या प्रकाराची तातडीने पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच पर्यावरणमंत्री महोदयांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नद्यांचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना नदीपात्र बुजवण्याचे प्रकार होत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here