ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा नवा उद्योग; ज्ञानी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या राईस मिलचा शुभारंभ

0
19
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा नवा उद्योग; ज्ञानी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या राईस मिलचा शुभारंभ
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा नवा उद्योग; ज्ञानी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या राईस मिलचा शुभारंभ

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा नवा उद्योग; ज्ञानी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या राईस मिलचा शुभारंभ

मालाडे-नांगरवाडी येथे आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला मिळणार चालना

मालाडे :
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाची जोड देणाऱ्या ज्ञानी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या राईस मिलचा शुभारंभ सोहळा मालाडे-नांगरवाडी येथे उत्साहात पार पडला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा उद्योजक मोहनशेठ धुमाळ यांच्या या उद्योगाचे उद्घाटन शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण भागात उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, शेतमालाला प्रक्रिया उद्योगाची जोड देणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राईस मिलच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना भात प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या शुभारंभ सोहळ्याला आमदार भाई जयंत पाटील यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र प्रवक्त्या चित्रलेखा नृपाल पाटील उपस्थित होत्या. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, पक्षाचे माजी तालुका चिटणीस अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य अंजली ठाकूर, शेकाप नेते गणेश मढवी, हेमंत ठाकूर, प्रमोद घासे, धुमाळ कुटुंबीय, माजी सरपंच नौशाद मुजावर, ग्रामपंचायतीचे इतर सदस्य, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागात स्थानिक साधनसंपत्तीवर आधारित उद्योग उभे राहिल्यास रोजगारनिर्मितीबरोबरच शेतकरी आणि परिसरातील नागरिकांनाही त्याचा लाभ होऊ शकतो. मोहनशेठ धुमाळ यांच्या या नव्या औद्योगिक वाटचालीचे उपस्थितांनी स्वागत केले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here