रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ‘रेल आर्केड’चे उद्घाटन; शाकाहारी आणि मांसाहारी रेस्टॉरंट्सची सुविधा उपलब्ध

0
19

रत्नागिरी :
कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ‘रेल आर्केड’ (Rail Arcade) ही नवीन सुविधा सुरू केली आहे. या रेल आर्केडचे उद्घाटन कोकण रेल्वेचे संचालक (संचालन व वाणिज्य) श्री. सुनील गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रत्नागिरीचे प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक (RRM) श्री. शैलेश बापट आणि उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक (Dy. CCM) श्री. आर. डी. घोलप उपस्थित होते.

या रेल आर्केडमध्ये प्रवाशांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या रेस्टॉरंट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या तसेच येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणासाठी अधिक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना स्थानकावरच खाद्यपदार्थ आणि जेवणाची सोय उपलब्ध व्हावी, या दृष्टीने रेल आर्केडची सुविधा उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
रत्नागिरी स्थानकावरील या नव्या सुविधेमुळे प्रवाशांच्या खाद्यसेवेत भर पडली असून, स्थानकावरील प्रवासी सुविधांमध्येही सुधारणा झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here