वाड्यात मनसेने शेतकरी बांधवांसोबत साजरी केली अनोखी दिवाळी

0
7
वाड्यात मनसेने शेतकरी बांधवांसोबत साजरी केली अनोखी दिवाळी
वाड्यात मनसेने शेतकरी बांधवांसोबत साजरी केली अनोखी दिवाळी

वाड्यात मनसेने शेतकरी बांधवांसोबत साजरी केली अनोखी दिवाळी

महिला भगिनींचाही भाऊबीजेनिमित्त सन्मान

वाडा :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाडा तालुक्यातील शीलपाडा येथे शेतकरी बांधवांसोबत दिवाळी आणि महिला भगिनींसोबत भाऊबीज साजरी करून सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वाडा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी शेतकरी बांधवांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेतला. तसेच भाऊबीजेनिमित्त महिला भगिनींचा सन्मान करून त्यांच्याप्रती आदर आणि आपुलकी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी मनसेचे वाडा तालुकाध्यक्ष कांतीकुमार ठाकरे यांनी तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांबाबत भूमिका मांडली. तालुक्यातील दुष्काळ, पाणीटंचाई तसेच इतर प्रश्नांच्या निवारणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक सदैव तत्पर राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक दीपक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि शीलपाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी बांधवांसोबत सणाचा आनंद वाटून घेत आणि महिला भगिनींचा सन्मान करून मनसेच्या वाडा तालुका शाखेने सामाजिक एकोपा आणि बांधिलकीचा संदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here