कलमठ येथील भगव्या पिंपळपारावर दीपोत्सव; शेकडो मेणबत्त्यांनी परिसर उजळला
कलमठ येथील भगव्या पिंपळपारावर शिवतेजा मित्रमंडळाचा दीपोत्सव
कलमठ / प्रतिनिधी :
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त कलमठ बाजारपेठेतील भगव्या पिंपळपारावर शिवतेजा मित्रमंडळाच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवामुळे संपूर्ण पिंपळपार आकर्षक रोषणाईने उजळून निघाला. मेणबत्त्यांच्या प्रकाशाने परिसरात उत्साहपूर्ण आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले.
शिवतेजा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी पिंपळपारावर मेणबत्त्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला. दिव्यांच्या प्रकाशाने भगव्या पिंपळपाराचे सौंदर्य अधिकच खुलून आले. या उपक्रमातून दीपावलीचा आनंद आणि एकतेचा संदेश देण्यात आला.
या दीपोत्सवात शिवतेजा मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन कुवळेकर, शशिकांत कांबळी, मंगल हजारे, पूजा हुन्नरे, तुषार हजारे, स्वरूप कोरगावकर, श्री. वायंगणकर, रोहित हजारे, प्रेरणा हजारे, मंथन हजारे, प्रसाद मठकर, राहुल कडुलकर, नील लोकरे, प्रथम लोकरे, दिव्या कडुलकर, भूमी कांबळी, माही कांबळी, प्राजक्ता कदम आदी सहभागी झाले होते.