मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची जीवन अंकुर वृद्धाश्रमाला दिवाळीनिमित्त भेट

0
12
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची जीवन अंकुर वृद्धाश्रमाला दिवाळीनिमित्त भेट
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची जीवन अंकुर वृद्धाश्रमाला दिवाळीनिमित्त भेट

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची जीवन अंकुर वृद्धाश्रमाला दिवाळीनिमित्त भेट

कुर्ला येथील जीवन अंकुर वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना पौष्टिक ड्रायफ्रूट लाडूंची भेट; आशीर्वाद घेत साजरा केला सणाचा आनंद

मुंबई / प्रतिनिधी :
दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा आणि आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा उत्सव. याच भावनेतून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी कुर्ला पूर्व येथील ‘जीवन अंकुर वृद्धाश्रमाला’ दिवाळीनिमित्त भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत सणाचा आनंद साजरा करत त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.

या भेटीदरम्यान महापौर रितू तावडे यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांची विचारपूस केली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू ज्येष्ठांना प्रेमाने भेट दिले. हे लाडू स्वीकारताना ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद पाहून आपल्याला विशेष आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण, त्यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यांच्याकडून मिळालेले आशीर्वाद हीच यंदाच्या दिवाळीतील सर्वात मोठी भेट असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सण-उत्सवांच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाचे क्षण घालवून त्यांना आपुलकीची जाणीव करून देणे, हाच या भेटीमागील उद्देश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here