डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा
मुंबई :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार संजय बनसोडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला.