कोंडुरे येथे शिवशंभो चॅम्पियन्स ट्रॉफी कबड्डी स्पर्धेत सह्याद्री वॉरियर्स आरोस विजेते

0
8

उपविजेतेपद वसंत चॅलेंजर्स मणेरी संघाला; भक्तियश साळगावकर सर्वोत्कृष्ट खेळाडू

कोंडुरे, ता. सावंतवाडी :
शिव शंभो कला क्रीडा मंडळ, कोंडुरे यांच्या वतीने सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व सावंतवाडी कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशझोतातील भव्य कबड्डी स्पर्धेत सह्याद्री वॉरियर्स आरोस संघाने प्रथम क्रमांक पटकावला. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी कोंडुरे येथे पार पडलेल्या ‘शिवशंभो चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६’ या स्पर्धेचे हे दुसरे पर्व होते. सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांतील संघांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेत सह्याद्री वॉरियर्स आरोस संघाने प्रथम क्रमांक मिळवला. या संघाचे आयकॉन आनंद नानचे, तर कर्णधार भक्तियश साळगावकर होते. वसंत चॅलेंजर्स मणेरी संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या संघाचे आयकॉन सुशील पाटकर आणि कर्णधार सूरज गवस होते. युगा वॉरियर्स संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या संघाचे आयकॉन परेश वालावलकर, तर कर्णधार विकी रेडीज होते.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून भक्तियश साळगावकर यांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट चढाईचा पुरस्कार सुशील पाटकर यांना, तर उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार आनंद नानचे यांना मिळाला.
स्पर्धेतील विजेत्या व सहभागी संघांचे सर्व खेळाडू आणि संघमालक यांचे आयोजक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच सर्वांना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here