कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘एक दिवस छोट्यांचा’ खाऊगल्ली महोत्सव

0
6
कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘एक दिवस छोट्यांचा’ खाऊगल्ली महोत्सव
कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘एक दिवस छोट्यांचा’ खाऊगल्ली महोत्सव

कणकवलीत २९ नोव्हेंबरला ” एक दिवस छोट्यांचा” खाऊगल्ली महोत्सव

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; एक हजार मुलांना प्रत्येकी ५० रुपयांचे मोफत खाऊ कूपन

समीर नलावडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

कणकवली(प्रतिनिधी) :

कणकवली येथे समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘एक दिवस छोट्यांचा’ हा खाऊगल्ली विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रम यंदा रविवार, २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. गणपतीसाना येथे सायंकाळी ५.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत हा आनंदोत्सव रंगणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी नगरसेवक बंडू हर्णे,संजय कामतेकर,राजा पाटकर,अमोल रासम,पंकज पेडणेकर, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम,राज नलावडे,सागर होडावडेकर, ऋतिक नलावडे आदी उपस्थित होते.
लहान मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांना एक दिवस मनसोक्त मजा-मस्ती आणि मनोरंजनाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने समीर नलावडे मित्रमंडळ आणि नगरसेवकांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन गेली ८ वर्षे केली जात आहे.यंदाच्या कार्यक्रमात लहान मुलांसाठी मुंबई येथून खास जादूगार बोलावण्यात येणार आहेत , त्याच्या जादूच्या प्रयोगांची मेजवानी मुलांना अनुभवता येणार आहे. जादूचे प्रयोग झाल्यानंतर मोठ्यांसाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांची आवडती गाणी तसेच हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय गाण्यांचा समावेश असेल,असे समीर नलावडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे एक हजार मुलांना प्रत्येकी ५० रुपयांचे मोफत खाऊ कूपन देण्यात येणार आहे. या कूपनच्या माध्यमातून मुलांना खाऊ गल्लीतील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. याशिवाय कार्टून पात्रे, सेल्फी पॉईंट, मुलांसाठी प्रश्नमंजुषा आणि योग्य उत्तरे देणाऱ्या मुलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाही चॉकलेटचा भव्य बॉक्स उघडून अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले जाणार आहे. या बॉक्समधील चॉकलेटसोबत काही विशेष कूपन ठेवण्यात येणार असून, ते मिळवणाऱ्या मुलांना आकर्षक भेटवस्तूही मिळणार आहेत. तसेच मुलांच्या आवडीनुसार हातावर टॅटू काढण्यासाठी दोन टॅटू कलाकारांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.
खाऊ गल्लीमध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यासाठी स्थानिक बचतगट, दुकानदार आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर स्टॉलची जागा दिली जाईल. स्टॉलधारकांना मंडळाच्या वतीने टेबल, दोन खुर्च्या, वीजजोडणी आणि आवश्यक सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत.लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी आणि कुटुंबीयांना एकत्रितपणे मनोरंजनाचा आनंद घेता यावा, यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आणि विशेषतः पालकांनी आपल्या मुलांसह या आनंदोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here