लांजा पंचायत समितीची आमसभा २५ नोव्हेंबरला; आमदार किरण सामंत अध्यक्षस्थानी

0
12

लांजा :
लांजा पंचायत समितीची आगामी आमसभा बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. लांजा येथील कोर्लेरोड परिसरातील श्री पाटीदार भवन सभागृहात ही सभा पार पडणार आहे.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत हे या आमसभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या सभेत तालुक्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प तसेच नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या आमसभेबाबतची अधिकृत माहिती गटविकास अधिकारी तथा आमसभेचे सचिव हिंदूराव गिरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here