शैलेश नेवाळकर यांना अनुकंपा तत्त्वावर कणकवली नगरपंचायतीत नियुक्ती; नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
शैलेश नेवाळकर यांना अनुकंपा तत्त्वावर कणकवली नगरपंचायतीत नियुक्ती; नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
सिंधुदुर्ग : अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या प्रतीक्षायादीतील पात्र उमेदवार शैलेश संतोष नेवाळकर यांना कणकवली नगरपंचायतीमध्ये लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाकडील अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या प्रतीक्षायादीत शैलेश नेवाळकर यांचा समावेश होता. महाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा नियुक्तीविषयक सर्वसमावेशक सुधारित धोरणानुसार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या माध्यमातून त्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून त्यांना लिपिक पदावर नियुक्ती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, नगरविकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त विनायक अंधेरकर आणि कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.