दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नौपाडा व्यापारी मंडळाकडून ४.०३ लाखांची मदत
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नौपाडा व्यापारी मंडळाकडून ४.०३ लाखांची मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ४ लाख ३ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
ठाणे :
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी नौपाडा व्यापारी मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे. मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा करण्यात आलेली ४ लाख ३ हजार रुपयांची मदत ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासह नौपाडा व्यापारी मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळावी, या उद्देशाने व्यापारी मंडळाने हा निधी जमा केला आहे.
व्यापारी मंडळाच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि आपत्तीच्या काळात गरजू नागरिकांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त झाली आहे.