कणकवली रेल्वे स्थानकावर अद्ययावत सिग्नल यंत्रणेचा शुभारंभ; लिफ्ट सुविधेचे काम सुरू
अद्ययावत सिग्नल यंत्रणेचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; प्रवाशांसाठी लिफ्ट सुविधेच्या कामालाही सुरुवात
कणकवली :
कणकवली रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रेल्वे स्थानकावरील अद्ययावत सिग्नल यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. या आधुनिक यंत्रणेमुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.



