रत्नागिरीत विनाअनुदानित खेळांच्या जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धा; संघटनांना आवाहन

0
8
रत्नागिरीत विनाअनुदानित खेळांच्या जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धा; संघटनांना आवाहन
रत्नागिरीत विनाअनुदानित खेळांच्या जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धा; संघटनांना आवाहन

रत्नागिरीत विनाअनुदानित खेळांच्या जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धा; संघटनांना आवाहन

रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे खेळ संघटनांना आवाहन; आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे निर्देश

रत्नागिरी :
खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात विनाअनुदानित खेळांच्या जिल्हा व विभागस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या स्पर्धा संबंधित एकविध खेळ संघटनांच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्यातून पार पडणार आहेत. त्यामुळे इच्छुक खेळ संघटनांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे संपर्क साधून पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
स्पर्धांच्या आयोजनासाठी संबंधित खेळ संघटनांनी नोंदणी प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र, तांत्रिक व आर्थिक सहकार्याचे पत्र तसेच स्पर्धा आयोजनाचे मागणीपत्र ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. यासाठी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
स्पर्धा आयोजित करण्यासाठी संबंधित ठिकाणी सुयोग्य क्रीडांगण, खेळासाठी आवश्यक साहित्य, खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था तसेच मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम व स्वच्छतागृहांची सुविधा असणे बंधनकारक आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धांमधील खेळप्रकार :
अष्टेड्डु आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग सु डो, फिल्ड आर्चरी, माँटेक्सबॉल, क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सिंग, हाफकिडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलंबम, वुडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवर लिफ्टिंग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेट बॉल, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप कॉन दो, युग मुं दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंटयाक्यु, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट्स डान्स, चॉकबॉल, शस्त्रांग मार्शल आर्ट, फुटबॉल टेनिस, बुडो मार्शल आर्ट, म्युझिकल चेअर आणि टेनिस बॉल क्रिकेट.
विभागस्तरीय स्पर्धांमधील खेळप्रकार :
फिल्ड आर्चरी, सुपर सेवन क्रिकेट, कुराश, लगोरी, बीच व्हॉलीबॉल आणि युग मुं दो.
या स्पर्धांच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित खेळ संघटनांनी वेळेत संपर्क साधून स्पर्धांच्या आयोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here