कणकवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील प्रवासी शेडचे उद्घाटन

0
8
कणकवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील प्रवासी शेडचे उद्घाटन
कणकवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील प्रवासी शेडचे उद्घाटन

कणकवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील प्रवासी शेडचे उद्घाटन

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण; प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण

कणकवली :
कणकवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील प्रवासी शेडचे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रेल्वे प्रवासी, प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून अनेक वर्षांपासून या शेडची मागणी करण्यात येत होती. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ही मागणी पूर्णत्वास आली आहे.

या सुविधेमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर रेल्वेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
खासदार नारायणराव राणे यांच्या माध्यमातून कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
या उद्घाटनप्रसंगी रत्नागिरीचे मंडल रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट, उपमुख्य कार्यकारी अभियंता संजय किल्लेदार, गोकुळ सोनवणे (ए.एस.सी., रत्नागिरी), राजेश सुरवाडे (पीआय, आरपीएफ कणकवली), सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक राकेश राणे, दादू राणे, मेघा गांगण, पप्पू पुजारे, अमोल रासम आणि सागर राणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here