‘सिरीयल किलर’ नाटकाचा १०० वा प्रयोग; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

0
12
 ‘सिरीयल किलर’ नाटकाचा १०० वा प्रयोग; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
 ‘सिरीयल किलर’ नाटकाचा १०० वा प्रयोग; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

 ‘सिरीयल किलर’ नाटकाचा १०० वा प्रयोग; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

शिवाजी मंदिर, दादर येथे शतकमहोत्सवी प्रयोगाचे आयोजन; कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मिती टीमचे केले कौतुक

मुंबई :
मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनय आणि दर्जेदार सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांची पसंती मिळवत सिंधूसंकल्प एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत आणि प्रणय तेली निर्मित ‘सिरीयल किलर’ या नाटकाने १०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. या शतकमहोत्सवी प्रयोगाचे आयोजन दादर येथील शिवाजी मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री नितेश राणे उपस्थित होते.

एखाद्या नाटकाने १०० प्रयोगांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करणे ही मराठी रंगभूमीसाठी निश्चितच अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे. या यशामागे कलाकारांचा कसदार अभिनय, दिग्दर्शकाचे कल्पक मार्गदर्शन, निर्मात्यांची मेहनत तसेच पडद्यामागे कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मोलाचे योगदान असते, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.
यावेळी नाटकाचे दिग्दर्शक केदार देसाई, सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री गायत्री दातार यांच्यासह नाटकाच्या संपूर्ण टीमची त्यांनी भेट घेतली. सर्व कलाकारांच्या अभिनयाचे, त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनाचे आणि मराठी रंगभूमीवरील योगदानाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
‘सिरीयल किलर’ या नाटकाने १०० प्रयोगांचा टप्पा गाठल्याबद्दल संपूर्ण टीमचे नितेश राणे यांनी अभिनंदन केले. तसेच नाटकाच्या पुढील वाटचालीसाठी आणि आगामी प्रयोगांच्या यशासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here