ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक अरुण खटावकर यांना ‘रोखठोक पत्रमहर्षी’ पुरस्कार प्रदान

0
6

मुंबई (विश्वनाथ पंडित) :
सामाजिक आणि विधायक कार्यात दीर्घकाळ योगदान देणारे तसेच आपल्या निर्भीड लेखणीतून समाजातील व्यथा, वेदना आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न रोखठोकपणे मांडणारे ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक अरुण खटावकर यांना साप्ताहिक ‘भगवे वादळ’च्या वतीने ‘रोखठोक पत्रमहर्षी’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
अरुण खटावकर यांनी अनेक वर्षांपासून वृत्तपत्र लेखनाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठविताना सर्वसामान्यांच्या समस्या आणि त्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. आपल्या लेखनातून समाजप्रबोधन आणि जनजागृती घडवून आणण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
वृत्तपत्र लेखनाबरोबरच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक आणि विधायक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांच्या पत्रकारितेतील निर्भीड भूमिका, सामाजिक बांधिलकी आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना ‘रोखठोक पत्रमहर्षी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here