दुष्काळात सरकारची ८० लाखांची उधळपट्टी; गोकुळमधील चार शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून आमदार सतेज पाटील यांची टीका
दुष्काळात सरकारची ८० लाखांची उधळपट्टी? गोकुळ संचालक नियुक्तीवरून आमदार बंटी पाटील यांचा आरोप
मुंबई :
राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात असताना आणि विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत असताना गोकुळ दूध संघातील चार शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी सरकारकडून ८० लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याचा आरोप आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केला आहे. या खर्चावरून त्यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
दुष्काळात सरकारची ८० लाखांची उधळपट्टी; गोकुळमधील चार शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून आमदार सतेज पाटील यांची टीका
गोकुळ दूध संघात सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती सरकारकडून साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर केला जात असल्याचा आरोप करत, चार शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे न्यायालयीन स्तरावर समर्थन करण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतून तब्बल ८० लाख रुपये खर्च करण्याचा शासन निर्णय घेण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
एकीकडे राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत, तर दुसरीकडे विकासकामांसाठी निधी अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील संचालक नियुक्तीच्या समर्थनासाठी सरकारी तिजोरीतून एवढी मोठी रक्कम खर्च करणे म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याची टीका आमदार बंटी पाटील यांनी केली आहे.