रेडी खूनप्रकरणाचा उलगडा! जंगलात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
14

वेंगुर्ला :
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील जंगलमय परिसरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खूनप्रकरणाचा सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वी उलगडा केला आहे. कौशल्यपूर्ण तपास आणि शिताफीने तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी प्रथम मृतदेहाची ओळख पटवली आणि त्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले.
रेडी येथील जंगलमय परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि खुनामागील कारणांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासातील विविध बाबींचा मागोवा घेत या क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा केला.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या या यशस्वी तपासामुळे रेडी येथील खूनप्रकरणाचा छडा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here