पाबळ ग्रामस्थांचे श्रमदानातून दोन वनराई बंधारे; पाणीपातळीत वाढ
पेण :
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून साकारत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाबळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून दोन वनराई बंधारे उभारले आहेत. ग्रामस्थांच्या एकजुटीतून उभारलेल्या या बंधाऱ्यांमुळे गावातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.




