आंबा-काजू फळपीक विम्यासाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत; शेतकऱ्यांकडे सात दिवस

0
13
आंबा-काजू फळपीक विम्यासाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत; शेतकऱ्यांकडे सात दिवस
आंबा-काजू फळपीक विम्यासाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत; शेतकऱ्यांकडे सात दिवस

 आंबा-काजू फळपीक विम्यासाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत; शेतकऱ्यांकडे सात दिवस

रायगड :
रायगड जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आता केवळ सात दिवस शिल्लक आहेत. सन २०२६-२७ साठी या योजनेअंतर्गत आंबा व काजू पिकांचा विमा उतरविण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी विमा नोंदणी करून घ्यावी.
या योजनेत आंबा पिकासाठी प्रति हेक्टर १ लाख ७० हजार रुपयांचे विमा संरक्षण असून शेतकऱ्यांना ८ हजार ५०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. काजू पिकासाठी प्रति हेक्टर १ लाख २० हजार रुपयांचे विमा संरक्षण असून शेतकरी हप्ता ४ हजार ८०० रुपये आहे. यंदा या योजनेत नारळ आणि सुपारी या फळपिकांचाही समावेश करण्यात आला आहे.
विमा नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे Farmer ID (AgriStack) असणे आवश्यक आहे. तसेच ई-पीक पाहणी DCS ॲपमध्ये संबंधित फळपिकाची नोंद, जिओ टॅगिंगसह फळबागेचा फोटो आणि फळबाग किमान पाच वर्षे वयाची असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना विमा नोंदणीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. तसेच जवळच्या सीएससी केंद्रात, बँकेत किंवा ऑनलाइन पद्धतीने विमा हप्ता भरता येणार आहे. योजनेबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here