श्रीवर्धन तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून कौतुक

0
6
श्रीवर्धन तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
श्रीवर्धन तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

श्रीवर्धन तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून कौतुक

दैनंदिन समस्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न कौतुकास्पद – अदिती तटकरे

श्रीवर्धन :
श्रीवर्धन तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध वैज्ञानिक प्रयोग, संकल्पना आणि नाविन्यपूर्ण विचार जाणून घेतले. विद्यार्थ्यांमधील उत्साह, जिज्ञासा आणि नवनवीन गोष्टी शोधण्याची जिद्द पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच बाल वैज्ञानिकांनी मांडलेले विचार, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि दैनंदिन जीवनातील समस्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधण्याचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.
विज्ञान हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता त्याचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी कसा करता येऊ शकतो, याची झलक या प्रदर्शनातून पाहायला मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढील काही दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि प्रदर्शनाच्या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या आयोजकांचे विशेष कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here