वैभववाडी-सडूरे-शिराळे रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी; उपसरपंच नवलराज काळे यांचे पालकमंत्र्यांना साकडे

0
3
वैभववाडी-सडूरे-शिराळे रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी
वैभववाडी-सडूरे-शिराळे रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी

वैभववाडी-सडूरे-शिराळे रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी; उपसरपंच नवलराज काळे यांचे पालकमंत्र्यांना साकडे

वैभववाडी ( प्रतिनीधी)
वैभववाडी ते सडूरे-शिराळे या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब व धोकादायक झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वाहनचालकांना समोरचे दिसण्यास अडथळा निर्माण होत आहे.
उपसरपंच नवलराज काळे यांचे पालकमंत्र्यांना साकडे
उपसरपंच नवलराज काळे यांचे पालकमंत्र्यांना साकडे
या परिसरात बिबट्या व गवे यांचा वारंवार वावर असल्याने स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः शाळकरी मुले, महिला व वृद्ध नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना भीतीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत सडूरे-शिराळेचे उपसरपंच *नवलराज विजयसिंह काळे* यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार नितेश राणे साहेब यांना निवेदन सादर करून रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
निवेदनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
१. वैभववाडी-सडूरे शिराळे मुख्य रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी.
२. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व झुडपे तातडीने काढून रस्ता मोकळा करावा.
३. नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
रस्त्याची तातडीने दुरुस्ती व स्वच्छता करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी उपसरपंच नवलराज काळे यांनी निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here