सक्रिय पदाधिकाऱ्यांनाच संधी द्या; आमदार प्रमोद जठार यांच्या सूचना

0
11
सक्रिय पदाधिकाऱ्यांनाच संधी द्या; आमदार प्रमोद जठार यांच्या सूचना
सक्रिय पदाधिकाऱ्यांनाच संधी द्या; आमदार प्रमोद जठार यांच्या सूचना

सक्रिय पदाधिकाऱ्यांनाच संधी द्या; आमदार प्रमोद जठार यांच्या सूचना

भाजपा संगमेश्वर दक्षिण तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

संगमेश्वर :
भारतीय जनता पार्टी संगमेश्वर दक्षिण तालुका कार्यकारिणीची बैठक विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. कार्यकारिणीतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार बदलण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना आमदार प्रमोद जठार यांनी दिल्या.
पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय राहून आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. संघटनात्मक कामकाजात निष्क्रियता खपवून घेतली जाणार नसल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.
या बैठकीत प्रामुख्याने सरल ॲपवर पक्षाचे संपूर्ण कार्यक्रम व उपक्रम प्रत्येक कार्यकर्त्याने नियमितपणे अपलोड करावेत, अशा सूचना करण्यात आल्या. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा दूत’ कार्यक्रमावर विशेष भर देण्यात आला. या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी कार्यक्रम प्रमुख श्री. अभिजीत शेटे यांच्याकडे सोपवून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय तालुक्यात होऊ घातलेल्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त सरपंच भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे निवडून आणण्याबाबत विस्तृत चर्चा करून त्यादृष्टीने आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला तालुकाध्यक्ष रुपेश कदम, सरचिटणीस योगेश शिर्के, जिल्हा परिषद गटनेते प्रमोद अडटराव, संगमेश्वर-चिपळूण विधानसभा प्रभारी अमित केतकर, अभिषेक शेटये, मुकुंद जोशी, सहदेव जी. बेटकर यांच्यासह तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस, शक्तिकेंद्र प्रमुख, महिला मोर्चा व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत तालुका कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा घेत पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटना अधिक सक्रिय व मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here