नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध
कणकवली:- दि. २७-
मालवणसह १० गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुखची ग्रामदेवता गिरोबाचा जत्रोत्सव भाविकांच्या अलौट गर्दीत संपन्न झाला. गिरोबा आणि कुल स्वामिनी लक्ष्मी सह बारा-पाच देवतांची गाभार्यात केलेली आकर्षक सजावट, शोभिवंत फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी, तलावात उभारलेला पाण्याचा नयनरम्य कारंजा आणि रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध झालेत.



